Skip to main content

Posts

ghost marrage-भुताच लगीन , marathi story horror. (भाग 2)

  ghost marrage-भुताच लगीन ghost marrage-भुताच लगीन , marathi story  horror. (भाग 2)  दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता. दिगंबर : मन्या..ए...मन्या अजून किती वेळ झोपशील? बघं दुपार झाली, उठ आता‌! त्याचा आवाज ऐकून मनोज जागा झाला आणि उठून इकडे तिकडे पाहू लागला. दिगंबर : काय रे मन्या काय बघतोय? मनोज : काही नाही रे, फक्त मला सांग! ती आली होती का? सकाळपासून. दिगंबर : कोण ती? मनोज : ती..ती चंद्रीका दिगंबर : नाही. मनोज : बरं झालं, तोवर आपण इथून निघून जाऊ. दिगंबर : का? काय झालं मनोज : दिग्या तुझा विश्वास नाही बसणार, पण काल रात्री मी एक भयानक प्रकार पाहिला, आणि मला समजलं की ती चंद्रीका एक जिवंत व्यक्ती नसून अतृप्त शक्ति आहे. दिगंबर : what nonsense मन्या..ऽ उगीच मूर्खा सारखं काहीतरीच बरळू नको! मनोज : अरे देवा शप्पथ खरं सांगतोय मी, विश्र्वास ठेव माझ्यावर! दिगंबर : मला ठाऊक आहे, तुला इथे रहायचं नाही,पण उगाच असल्या भाकडकथा मला सांगून माझ्या कामावरचा focus हलवू नको! तुला जर जायचे असेल तर तू जा , पण मी तर माझं काम पूर्ण झाल्याशिवाय येणार नाही! असं म्हणतं दिगंबर खोलीच्या बाहेर निघून गेला. "...

ghost marrage-भुताच लगीन , marathi story horror. (भाग १)

 नमस्कार मित्रांने आज तुमच्या सोबत  करत आहे. ghost marrage-भुताच लगीन , marathi story horror.  (भाग १) ghost marrage-भुताच लगीन , marathi story horror.(भाग1) मध्ये तुम्हाला मनोरंजन व एक चांगली सिख मिळेल. ghost marrage-भुताच लगीन , marathi story horror.   ghost marrage-भुताच लगीन , marathi story horror. (भाग १) आईऽ..ऐ...आईऽ कुठेस गं ? हे बघं मी आलोय कामावरून, लवकर बाहेर ये! पार्कींग मध्ये गाडी लावता लावता दिगंबर आईला हाक मारू लागला. त्याचा आवाज ऐकून त्याची आई बाहेर आली. "हा ! आलास तू ऐवढी आरडाओरडा कशाला करतोय, नक्कीच चहा हवा असणारं म्हणूनच ना? तू आधी हातपाय स्वच्छ धुऊन घे मग ये चहा प्यायला." You also read this story :-   कारखान्यातील भूत "अगं.. तुझ्या चहाला मार गोळी, एक गुड न्यूज आहे, ती तर ऐकून घे!" "अरे व्वा.. गुड न्यूज, खरंच?" भुवया उंचावून आई म्हणाली. "हो..! माझ्या ६ महिन्यांच्या कामावर खूश होऊन, बाॅस ने मला प्रमोशन दिलंय आणि त्याबरोबर एक नवीन प्रोजेक्ट सुध्दा दिलाय. "अरे व्वा..देवच पावला म्हणायचा,थांब आधी देवापुढे साखर ठेवून येते" ...

कारखान्यातील भूत stories,marathi-marathi story horror

 नमस्कार मित्रांने आज तुमच्या सोबत "करखान्यातील भूत  stories,marathi-marathi story horro"r शेअर करत आहे.   "stories,marathi-marathi story horror" मध्ये  तुम्हाला मनोरंजन व एक चांगली सिख मिळेल. कारखान्यातील भूत कारखान्यातील भूत stories,marathi-marathi story horror. कोणे एके काळी भंडारा जिल्ह्यात विड्या वळण्याचा उद्योग भरभराटीस होता. स्वस्त आणि मुबलक मनुष्यबळ,जंगलात मोठ्या प्रमाणात उगवणारी तेंदूची झाडे आणि विडी कारखान्याला असणारे पोषक वातावरण, ह्यामुळे बर्याच उद्योजकांनी बिडी कारखाने चालवले होते.  सिगारेटींचे एवढे प्रस्थ नव्हते; गावोगावी, चौकाचौकांत विड्याच फ़ुंकल्या जात.  एकूणच विडी कारखान्यांना भरभराट होती, नफ्याचा उद्योग होता. काळ बदलला. विड्या ओढणे गावंढळपणा झाला. सिगारेटी ओढणे ‘फॅशन’ म्हणवू लागली. आता गावागावांत, चौकाचौकांत तरुण पोरं सिगारेटी ओढत ‘स्टाईल’ मारु लागली.  विड्यांची विक्री दिवसेंदिवस मंदावत होती. नक्षलवाद्यांच्या वाढत्या त्रासामुळे जंगलातून तेंदूपत्ता आणणे जिकीरीचे होऊ लागले.  तेंदूपत्ता महाग झाला. विडी कारखान्यांना ओहोटी लागली...

Chandra grahan-चंद्र ग्रहण marathi story horror

 नमस्कार मि तुम्हाला आज माझ्या जीवनातला एक भया वय प्रसंग जो रात्रि Chandra grahan-चंद्र ग्रहण marathi story horror या नवीन पाठत सांगत आहे । नक्कीच तुम्हाला घाम सूटेल हा पाठ पूर्ण वाचून जा अशी माझी विनती आहे! Chandra grahan-चंद्र ग्रहण marathi story horror  आपल्या हातात त्या लहानग्या शितलला घेऊन, त्या बाळाला घेऊन समर्थांनी तिच्यावर एकवेळ पूर्ण कटाक्ष टाकला आणि समोर बसलेल्या विनायकरावाना ... समर्थांनी एका चिंतीत नजरेने पाहिले आणि मुलीचा जन्मवेळ, जन्मकाल दिवस कि रात्र , जन्मस्थळ सर्व विचारून घेतले....  आणि परत विनायकरावाकडे पाहत आपल्या दोन्ही भुवया चिंतेच्या सुरात गोळा करीत उत्तरले... "विनायकराव, मुलीच्या पत्रिकेत विचित्र दुष्टचक्र चालू आहे. जन्माला तिच्या एक दुष्ट काळ लागलाय बघा...  हे आम्ही पहिल्यांदाच पाहतोय अशी विचित्र कुंडली एकवेळ कुंडलीतील दोष समजल्यावर त्याला उपाय करता येतो पण हे तर भलतच काही तरी आहे.. जणू ग्रहण लागलय मुलीच्या आयुष्याला ... " त्यावर विनायकराव त्या हातातील चिमुकलीकडे ओशाळून पाहत म्हणाले...  "समर्थ असे नका हो म्हणू , अहो काही उपाय नाही का यावर...