नमस्कार मित्रांने आज तुमच्या सोबत करत आहे. ghost marrage-भुताच लगीन , marathi story horror. (भाग १) ghost marrage-भुताच लगीन , marathi story horror.(भाग1) मध्ये तुम्हाला मनोरंजन व एक चांगली सिख मिळेल. ghost marrage-भुताच लगीन , marathi story horror. ghost marrage-भुताच लगीन , marathi story horror. (भाग १) आईऽ..ऐ...आईऽ कुठेस गं ? हे बघं मी आलोय कामावरून, लवकर बाहेर ये! पार्कींग मध्ये गाडी लावता लावता दिगंबर आईला हाक मारू लागला. त्याचा आवाज ऐकून त्याची आई बाहेर आली. "हा ! आलास तू ऐवढी आरडाओरडा कशाला करतोय, नक्कीच चहा हवा असणारं म्हणूनच ना? तू आधी हातपाय स्वच्छ धुऊन घे मग ये चहा प्यायला." You also read this story :- कारखान्यातील भूत "अगं.. तुझ्या चहाला मार गोळी, एक गुड न्यूज आहे, ती तर ऐकून घे!" "अरे व्वा.. गुड न्यूज, खरंच?" भुवया उंचावून आई म्हणाली. "हो..! माझ्या ६ महिन्यांच्या कामावर खूश होऊन, बाॅस ने मला प्रमोशन दिलंय आणि त्याबरोबर एक नवीन प्रोजेक्ट सुध्दा दिलाय. "अरे व्वा..देवच पावला म्हणायचा,थांब आधी देवापुढे साखर ठेवून येते" ...